Join us  

नातवाच्या संगीत सेरेमनीमध्ये धर्मेंद्र यांनी केला जबरदस्त डान्स, INSIDE व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 4:21 PM

सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या संगीत सेरेमनीतील व्हिडिओ समोर येत आहेत, त्यापैकी एका व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल त्याची दीर्घकाळाची मैत्रीण द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या देओल कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. करण आणि दिशाच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन्स सुरू आहेत. 16 जून रोजी करण देओलचा संगीत सेरेमनी झाली. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल होतायेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात करण त्याचे आजोबा आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्रसोबत दिसत आहे.

करण देओलच्या संगीत सेरेमनीत अनेक बॉलिवूड स्टार्सही पोहोचले होते. अनेकांनी जोरदार डान्सही केला. एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये धर्मेंद्र डान्स करताना दिसत आहेत. आपल्या नातवाच्या संगीत सोहळ्यात धर्मेंद्र जेव्हा स्टेजवर पोहोचले तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच खिळल्या होत्या. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आणि करण यमला पगला दिवाना या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आजोबा आणि नातवाचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र नातवाच्या संगीत कार्यक्रमात स्टेजवर सूट बूट घालून डान्स करताना दिसतायेत. धर्मेंद्र यांच्या रॉकिंग डान्स पाहून चाहत्यांच्या त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण झाली.  वडिलांना नाचताना पाहून सनी देओल भावूक झाला आणि त्यानेही स्टेजवर पोहोचून त्यांना मिठी मारली. 

करण देओलच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करण देओलच्या संगीत सोहळ्यात रणवीर सिंगही उपस्थित होता आणि त्यानेही डान्स केला. 

टॅग्स :धमेंद्रसनी देओलकरण देओल