Join us  

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी मीडियाच्या कॅमे-यात कैद, लाइमलाइटपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 5:19 PM

प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचा संसार अतिशय आनंदात सुरू असताना 1975 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली आणि काहीच वर्षांत त्यांनी लग्न केले.

बॉबी देओल जास्त कौटुंबिक कारणामुळे चर्चेत असतो. नेहमीच सोशल मीडियावर देओल कुटुंबाचे गोडवे गाताना चाहते पाहायला मिळतात. आणखीन एका फोटोंमुळे देओल कुटुंबाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ते म्हणजे बॉबी देओल नेहमीप्रमाणे कुटुंबासह स्पॉट झाला. यावेळी या सगळ्यांमध्ये एका व्यक्तीनेच सा-यांचे लक्ष वेधले. ती व्यक्ती होती बॉबी देओल आणि सनी देओल यांची आई म्हणजेच धर्मेद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर. या नेहमीच लाइमलाइटपासून लांब राहणेच पसंत करतात. खूप कमी वेळा प्रकाश कौर मीडिया समोर येतात. धर्मेद्र आणि प्रकाश कौर यांना सनी देओल, बॉबी देओल आणि अजिता, विजेता त्यांची मुलं आहेत.  

1954 साली  प्रकाश कौर यांनी धर्मेद्र यांच्याशी लग्न केले . धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचे अरेंज मॅरेज होते. अवघ्या धर्मेंद्र केवळ 19 वर्षांचे असताना त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचा संसार अतिशय आनंदात सुरू असताना 1975 मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली आणि काहीच वर्षांत त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच हेमा मालिनी यांच्यासह लग्न केले आहे. हेमा मालिनीसह लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र यांनी पित्याची जबाबदारी चोख निभावली. रोज संध्याकाळी मुलांसह वेळ घालवण्यासाठी धर्मेंद्र पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या घरी जायचे. तसेच प्रकाश कौर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नात्याविषयी मत मांडले होते. त्यांनी म्हटले होते की, धर्मेंद्र एक पती म्हणून नाही पण पिता म्हणून उत्तमप्रकारे जबादारी पार पाडतात. त्यांचे त्यांच्या मुलांवर खूप प्रेम आहे.  

जर मी हेमा मालिनीच्या जागी राहिली असती तर तशी कधीच वागली नसती. हेमालाही जगाचा सामना करावा लागत असणार एक स्त्री म्हणून तिची धर्मेंद्र यांच्यासह लग्न केल्यानंतर जगाला सामोरे जाताना होणारी तगमग ही मी समजू शकते असे त्यांनी म्हटले होते. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांतील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हते. तसेच या इंडस्ट्रीत त्यांचा कोणीही गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले.

पंजाबच्या लुधियाना शहरातील नुसराली या गावी धरमसिंग देओल यांचा जन्म झाला. केवल किशनसिंग देओल आणि सत्वंत कौर हे त्यांचे आई-वडील. लुधियानाच्या गव्हर्नमेंट सिनिअर सेकंडरी स्कूल आणि फगवारा येथील रामग्रहीय कॉलेजमध्ये धर्मेंद्र यांनी शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षीच फिल्मफेअर’चा न्यू टॅलेंट अ‍ॅवॉर्ड त्यांनी मिळवला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :धमेंद्र