The most viewed Hindi song of all time on Youtube! Amazing ! #NasheSiMostViewedHindiSongpic.twitter.com/CPr4Vs1dI2— Ranveer Singh (@RanveerOfficial) May 5, 2017
रणवीर सिंगच्या बेफिक्रेमधील गाण्याची यूट्यूबवर धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 16:57 IST
रणवीर सिंग चा चित्रपट बेफिक्रेमधील नशे सी चढ गई या गाण्याने यूट्यूबवर नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. हे गाणे ...
रणवीर सिंगच्या बेफिक्रेमधील गाण्याची यूट्यूबवर धूम
रणवीर सिंग चा चित्रपट बेफिक्रेमधील नशे सी चढ गई या गाण्याने यूट्यूबवर नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. हे गाणे यूट्यबर सगळ्यात जास्त पाहण्यात आले आहे. यशराज फिल्म्सने ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. रणवीर सिंगने सुद्धा ट्वीट करत यूट्यूबची स्तुती केली आहे. 230 मिलियन व्यूज या गाण्याला मिळाल्या आहेत. रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या या चित्रपटातील हे गाणे अरिजीत सिंगने गायले आहे. एका मुलाखाती दरम्यान संगीतकार विशाल-शेखरने सांगितले होते डायरेक्टर आदित्य चोप्राच्या डोक्यात आधीपासूनच या गाण्याच्या ओळी होत्या. अरिजीत सिंगने देखील या गाण्यामागे मेहनत घेतली आहे. रोमांस किंग अरिजीत सिंगने हे गाणे मस्तीभऱ्या अंदाजात गायले आहे. या गाण्याला रणवीर सिंग आणि वाणी कपूरवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याची कोरियोग्राफी वैभवी मर्चेंटने केली होती. वैभवी मर्चेंटने सांगितले होते या चित्रपटात रणवीरला डान्स करायचा होता. मात्र जेव्हा वैभवीने रणवीरला डान्सच्या स्टेप्स शिकवायला घेतल्या तेव्हा त्याची चांगलीच तारांबळी उडाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून 8 वर्षानंतर आदित्या चोप्राने दिग्दर्शन केले होते. याचित्रपटाचे प्रमोशन सुद्धा यशराज फिल्म्सने अत्यंत वेगळ्या पद्धतीने केले होत जसे आजपर्यंत बॉलिवूडच्या कोणत्याच चित्रपटाचे झाले नव्हते. याचित्रपटातकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर रणवीर आणि वाणीची केमिस्ट्री आपला जलवा दाखवू शकली नाही. अनेक हॉट सीन्स असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा रिपोन्स मिळाला नाही. मात्र या व्यतिरिक्त या चित्रपटातील गाण्याने यूट्यूबवर एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.