Join us

अपूर्ण राहिलं होतं सुरैया यांच्यासोबतचं पहिलं प्रेम, शेवटच्या भेटीनंतर ढसाढसा रडले होते देव आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 07:15 IST

देव आनंद यांच्या कित्येक अभिनेत्रींसोबतच्या रोमांसच्या चर्चा असायच्या. मात्र सुरैया त्यांचे पहिले प्रेम असल्याचं सांगितलं जातं.

देव आनंद यांच्या कित्येक अभिनेत्रींसोबतच्या रोमांसच्या चर्चा असायच्या. मात्र सुरैया त्यांचे पहिले प्रेम असल्याचं सांगितलं जातं. या दोघांची लव्हस्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चित स्टोरीपैकी एक होती. पण, या लव्हस्टोरीचा शेवट खूप वाईट होता.

देव आनंद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते सुरैयापासून वेगळे झाले होते तेव्हा ते घरी जाऊन त्यांच्या भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडले होते आणि सुरैयाला विसरून जायची शपथ घेतली होती. म्हणजे जीवनात पुढे जाऊ शकतील. 

१९४० साली देव आनंद व सुरैया यांच्या प्रेमकथेला सुरूवात झावी होती. त्यावेळी देव आनंद चित्रपटांमध्ये आपला जम बसवत होते आणि सुरैया त्यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका होत्या. सुरैया यांच्या सौंदर्याचे देव आनंद दीवाने झाले होते. ते दोघे एकत्र आले ते विद्या चित्रपटाच्या सेटवर. त्या दोघांची एकत्र असलेला हा पहिला चित्रपट होता. देव आनंद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

त्यांनी पुढे सांगितले की, सुरैया व मी चित्रपटात काम करण्यासाठी एकत्र आलो होतो. ती खूप चांगली होती. तिच्या मैत्रीपूर्ण व्यवहारामुळे मी प्रभावित झालो. एवढी मोठी स्टार असतानाही तिला अजिबात गर्व नव्हता. तिच्यावर माझे जीवापाड प्रेम होते. त्यावेळी मी तरूण होतो आणि माझे हे पहिले प्रेम होते. सुरैया यांच्या आईला त्या दोघांना एकत्र पाहायचे होते. मात्र असे झाले नाही. एक दिवस ते दोघे शेवटचे भेटले आणि चार वर्षांपासूनचे नाते संपवून टाकले. 

कसेबसे देव आनंद या परिस्थितीतून बाहेर पडले आणि त्यांनी कल्पना कार्तिक यांच्यासोबत लग्न केलं. सुरैया यांचे २००४ साली निधन झाले तर देव आनंद यांनी २०११ साली अखेरचा श्वास घेतला.

टॅग्स :देव आनंदसुरैय्या