Join us

देसी गर्ल करणार ‘बेवॉच’ च्या शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 23:01 IST

 द्वेने ‘द रॉक’ जॉनसन आणि झॅक इफ्र ॉन यांनी मियामी येथे ‘बेवॉच’ च्या शूटिंगला सुरूवात केली आहे. पण, देसी ...

 द्वेने ‘द रॉक’ जॉनसन आणि झॅक इफ्र ॉन यांनी मियामी येथे ‘बेवॉच’ च्या शूटिंगला सुरूवात केली आहे. पण, देसी गर्ल प्रियंका चोप्रा मात्र पुढील आठवड्यात चित्रपटाच्या टीमला जॉईन करणार आहे. यासाठी की ती अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तिचा रोल खलनायकाचा असून तिला अजून शूटिंगसाठी थोडा वेळ लागणार आहे. पीसी म्हणते,‘ मी ‘7 खुन माफ’ नंतर निगेटिव्ह रोल केलाच नाहीये. मला ज्याप्रकारची स्क्रिप्ट मिळाली आहे ती अत्यंत फनी आहे. मी गेल्या आठवडयात चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत स्क्रिप्टचे वाचन केले होते. आम्ही सतत आमची स्क्रिप्ट वाचत होतो. टीव्ही सीरिज पाहतच आम्ही मोठे झालो म्हणून आता चित्रपटाची शूटिंग सुरू करायला थांबता येणार नाही.द्वेने याने तिला ‘इंसेनली टॅलेंटेड, रिलेंटलेसली स्मोकिंन आणि एक्सट्रीमली डेंजरस.’ रिडींग सेशनच्या वेळी टीमने तिचे वेलकम केले. आणि ते एकमेकांना ओळखत असल्याने जास्त चांगली बाँण्डिंग तयार झाली. ती मॉन्ट्रिअल आणि मिआमी यांच्यात अडकली आहे.