डिप्पी-क्रिस वु ‘ट्रिपल एक्स’ मध्ये दिसणार सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 21:46 IST
दीपिका पदुकोन हिने ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाच्या माध्यमातून हॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ चित्रपटात ...
डिप्पी-क्रिस वु ‘ट्रिपल एक्स’ मध्ये दिसणार सोबत
दीपिका पदुकोन हिने ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाच्या माध्यमातून हॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्सझांडर केज’ चित्रपटात ती अभिनेता विन डिजेलसोबत काम करत आहे. तिच्यासह बॉलीवूडही तितकेच उत्साहित आहेत, की तिचा हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होतो यासाठी. नुकतेच तिला या चित्रपटासाठी काही टॅटूजही मिळाले आहेत. पण हे टॅटू कायमचे नाहीत. चित्रपटाचा दिग्दर्शक डी.जे.दरूसो याने नुकतेच डिप्पीचे काही टॅटूजचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत डीप्पीसोबत चायनीज-कॅनेडियन स्टार क्रिस वु आहे. चित्रपटात तो देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. त्याने टिष्ट्वट केले की,‘ क्रिसवु, दीपिका आणि मी ट्रिपल एक्सच्या पोजमध्ये. या दोघांना सेटवर एकत्र पाहण्याचे माझे स्वप्नच आहे. वॉव!’