Join us  

हिला वेड्यांच्या रूग्णालयात पाठवा किंवा तुरुंगात डांबा...! कंगना राणौतच्या पोस्टमुळे शीख समुदाय भडकला, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 2:10 PM

सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे वाद ओढवून घेणाऱ्या Kangana Ranautच्या नव्या पोस्टने पुन्हा एकदा नवा वाद उफाळून आला आहे.

सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे वाद ओढवून घेणाऱ्या कंगना राणौतच्या ( Kangana Ranaut) नव्या पोस्टने पुन्हा एकदा नवा वाद उफाळून आला आहे.1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने अलीकडेच केलं होतं. त्यावरून तिच्यावर चौफेर टीका झाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच कंगनाने नवा वाद ओढवून घेतला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर  दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (Delhi Sikh Gurudwara Management Committee) कंगनाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

काय आहे कंगनाची पोस्टकंगनाने इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ‘खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतीलही, पण एका महिलेला विसरून चालणार नाही. देशाच्या एकमेव महिला पंतप्रधानाने या खलिस्तानींना आपल्या चपलेखाली चिरडलं होतं. इंदिरा गांधींनी स्वत:च्या जीवाची किंमत देत यांना डासांसारखं चिरडलं आणि देशाचे तुकडे होण्यापासून वाचवलं. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतरही इतक्या दशकांपासून ते त्यांच्या नावाने थरथर कापतात. त्यांना असाच गुरु पाहिजे,’असं कंगनाने तिच्या इन्स्टास्टोरीत लिहिलं आहे.

दिल्ली शीख गुरूद्वारा व्यवस्थापन समितीने दाखल केली तक्रारकंगनाच्या या वादग्रस्त पोस्टनंतर दिल्ली शीख गुरूद्वारा व्यवस्थापन समितीने  मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तिला वेड्यांच्या रूग्णालयात पाठवा, नाही तर तुरुंगात डांबा.. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी शिखांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कंगनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.  कंगनाला एकतर म्वेड्यांच्या रूग्णालयात पाठवा किंवा तुरुंगात डांबा, अशा आशयाचं टिष्ट्वट त्यांनी केलं आहे.  

टॅग्स :कंगना राणौत