सोनम कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘नीरजा’ चित्रपट सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा भाग बनला आहे. उत्तम सादरीकरण आणि अभिनय यांच्यामुळे चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.नीरजा भनोत हिच्या जीवनावर आधारित चित्रपट असल्याने सर्वांनी पाहण्यासारखा आणि तिचे चरित्र अभ्यासण्यासारखा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ‘नीरजा’ ला महाराष्ट्रात टॅक्स फ्री केल्यानंतर आता गुजरात, दिल्ली, युपीमध्येही टॅक्स फ्री करण्यात आला आहे. दिल्लीचे डेप्युटी सीएम मनिष ससोदिया यांनी टिष्ट्वटरवर ही बातमी पोस्ट केली आहे. त्यांनी टिष्ट्वट केले की,‘हॅव आॅर्डर्ड टू मेक मुव्ही नीरजा टॅक्स-फ्री. डिसीजन टू बी इम्प्लिमेंटेड विथ इमिजिएट इफेक्ट. ’