Join us

DeepVeer Reception :हे खरंच आहेत Made for each other couple, हा व्हिडीओ पाहून सारेच म्हणतील नवरा असावा तर असा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 9:55 AM

बॉलीवूडच्या बाजीराव-मस्तानी यांचे बेंगळुरुमध्ये रिसेप्शन सोहळा पार पडला. यावेळी दोघांमधली केमिस्ट्री पुन्हा एकदा साऱ्या जगाला पाहायला मिळाली.

ठळक मुद्देफोटोग्राफर्सनी यावेळी रणवीर आणि दीपिकाला सिंगल फोटोसाठी रिक्वेस्ट केलीस्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार रणीवर एकदम क्लिअर होता त्याला सोलो फोटो द्यायचे नव्हते.  

बॉलीवूडच्या बाजीराव-मस्तानी यांचे बेंगळुरुमध्ये रिसेप्शन सोहळा पार पडला. यावेळी दोघांमधली केमिस्ट्री पुन्हा एकदा साऱ्या जगाला पाहायला मिळाली. या ग्रँड रिसेप्शनच्या ठिकाणी दीपिकाने रणवीरच्या हातात हात घालून एंट्री केली. प्रसार माध्यामांसमोर दोघांनी भरपूर पोझेस देत फोटो काढले. यावेळी दीपिकाच्या सारीचा पदर काहीसा उलट सुलट झाला रणवीरने क्षणाचा ही विलंब न करता पुढे येत तिचा पदर सरळ करत दीपिकाच्या दिशेने फ्लाइंग किस दिली. दीपिका काही क्षणासाठी लाजली देखील. 

द लीला प्लॅलेसमध्ये झालेल्या ग्रँड रिसेप्सशनला खेळ जागातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. दीपवीरच्या रॉयल लूकने सगळ्यांची मनं जिंकली. सोशल मीडियावर रिसेप्शन दरम्यानचे फोटो व्हायरल होत आहेत.  

 फोटोग्राफर्सनी यावेळी रणवीर आणि दीपिकाला सिंगल फोटोसाठी रिक्वेस्ट केली असता रणवीरने स्पष्ट शब्दात नकार दिला. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार रणीवर एकदम क्लिअर होता त्याला सोलो फोटो द्यायचे नव्हते.  

गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत रणवीर-दीपिका विवाहबद्ध झालेत. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे.  २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग