Join us  

Deepti Naval : दीप्ती नवल यांच्यावर अँजिओप्लास्टी, रूग्णालयातून डिस्चार्ज

By रूपाली मुधोळकर | Published: October 21, 2020 11:19 AM

Deepti naval undergoes angioplasty at mohali suffered a heart symptom : खुद्द दीप्ती नवल यांनी दिली माहिती .

ठळक मुद्देदीप्ती नवल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. जुनून,  चश्मेबद्दूर, कथा,  साथ-साथ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्यात.  

चश्मे बद्दूर  आणि  श्रीमान श्रीमती  यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम करणा-या 68 वर्षीय  अभिनेत्री दीप्ती नवल Deepti Naval अलीकडे त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आल्या होत्या. नुकतेच दीप्ती यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे वृत्त आले होते. मात्र आता दीप्ती यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.पीटीआयशी बोलताना खुद्द दीप्ती नवल यांनी ही माहिती दिली. सोमवारी माझ्यावर अँजिओप्लास्टी झाली. मंगळवारी मला रूग्णालयातून डिस्चार्ज झाला. आता मी एकदम ठणठणीत आहे, असे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनदरम्यान दीप्ती मोहालीतील घरी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या तिथेच मुक्कामाला आहेत.

दीप्ती नवल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. जुनून,  चश्मेबद्दूर, कथा,  साथ-साथ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्यात.  पंजाबमध्ये जन्मलेल्या दीप्ती नवल यांचे बालपण अमेरिकेत गेले. त्यांचे वडील अमेरिकेतल्या सिटी विद्यापीठात शिक्षक होते. अभिनय क्षेत्रात येण्याचे निश्चित करून त्यांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 1978मध्ये श्याम बेनेगल याच्या ‘जुनून’ चित्रपटातून त्यांनी मनोरंजनविश्वात पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. त्यांच्या अभिनयाने अनेक चित्रपट सुपरडुपर हिट ठरले. सध्या त्या मनोरूग्णांसाठी काम करत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या कार्य करत आहेत. याशिवाय विनोद पंडित यांच्या नावाने असलेल्या  विनोद पंडित चॅरिटेबल ट्रस्टशी जुळलेल्या आहेत. कवयित्री, चित्रकार आणि फोटोग्राफर अशीही त्यांची ओळख आहे.

सतत आत्महत्येचे विचार येत होते...सुशांत सिंग राजपूतच्या  निधनाची बातमी ऐकताच दिप्ती नवल यांनाही धक्काच बसला होता. आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिप्ती नवल यांनी एक धक्कादायक खुलासा केला होता. ‘  90 व्या दशकाच्या अखेरीस  ा काम मिळणे बंद झाले होते. ते अपयश सहन करणे कठीण जात होते. त्यामुळेच मानसिक संतुलन बिघडले होते.  मनात सारखे आत्महत्या करण्याचे विचार यायचे. मात्र टोकाचे पाऊल न उचलता मी मोठ्या धैर्याने या डिप्रेशनचा सामना केला आणि त्यातून बाहेर पडले. हा डिप्रेशनचा कालावधी खडतर आणि आव्हानात्मक होता,’ असे त्यांनी सांगितले होते. 

दीप्ती नवल यांची अधुरी प्रेमकहाणी; साखरपुडा झाला पण नाही होऊ शकले लग्न

"मलाही वाटले होते आत्महत्या करावी"'.... सुशांतच्या निधनाबाबत बोलताना या अभिनेत्रीने केले अनेक धक्कादायक खुलासे

 

टॅग्स :दीप्ती नवलबॉलिवूड