Join us

टोरँटोमध्ये दीपिकाचा रिलॅक्स फेरफटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 09:06 IST

टोरँटोमध्ये दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. तिच्या बिझी शेड्यूलमधून ...

टोरँटोमध्ये दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. तिच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा निवांत वेळ काढून ती टोरँटोच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसली.ती एकदम ‘कुल अ‍ॅण्ड रिलॅक्स’ कॅज्युअल चिक गेटअप मध्ये दिसली. ती सध्या फार चांगल्या मुडमध्ये दिसते आहे. सध्या ती तिच्या करिअरच्या दृष्टीकोनातून फारच चांगल्या काळातून जात आहे त्यामुळे बहुधा खुश असणार यात काही शंका नाही.‘बाजीराव मस्तानी’ च्या हिटनंतर ती आता ‘ट्रिपल एक्स’ च्या यश आणि चर्चेमुळे खुश आहे. बाजीराव मस्तानीमध्ये ती रणवीर सिंग सोबत होती. तिला आता ट्रिपल एक्सकडून खुप अपेक्षा आहेत. यात ती विन डिजेलसोबत दिसणार आहे.वेल, दिपीका तू जर अशी टोरँटोच्या रस्त्यावरून फिरलीस तर तिथल्या तरूण मुलांचं काय होईल गं? अनेकांना ‘हार्टब्रेक’ मुळे नैराश्यात जावे लागेल. सो...असं काही करू नकोस?