Join us

ट्रिपल एक्समध्ये दिसणार दिपीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:55 IST

दीपिका पदुकोन हॉलीवूड स्टार विन डिजल याच्यासोबत आगामी चित्रपट 'ट्रिपल एक्स'मध्ये दिसणार असून तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर ...

दीपिका पदुकोन हॉलीवूड स्टार विन डिजल याच्यासोबत आगामी चित्रपट 'ट्रिपल एक्स'मध्ये दिसणार असून तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला . त्यात विन डिजल पाठमोरा असून दीपिका कॅमेºयाकडे पाहतेय असा आहे. पुन्हा तिने दोघांचा सेल्फीही पोस्ट केला. पण, अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांनी दीपिकाची गंमत करायचे ठरवले. आणि तशाच पोझमध्ये त्यांनी फोटोही काढला. त्या फोटोला कॅप्शन दिले की, 'सिन्स विन डिजल इज बिझी विथ अँट दीपिका पदुकोन, वी अँट हाऊसफुल्ल 3 आर मेकिंग डू विथ विन पेट्रोल.'photo source: indian express