बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या लग्नाच्या तयारीत गुंतलीय. २०१८ च्या अखेरिस दीपिका बॉयफ्रेन्ड रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळेचं ‘पद्मावत’नंतर तिने कुठलाच सिनेमा साईन केलेला नाही. पण दीपिकाच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची खबर आहे. होय, बॉलिवूड नाही पण हॉलिवूडचा दुसरा चित्रपट दीपिका नक्की साईन करणार आहे. होय, विन डिजलच्या ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटातून दीपिकाने हॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण यातून दीपिकाने केलेला डेब्यू मात्र चांगलाच यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये तिला वेगळी ओळख निर्माण करता आली. हॉलिवूड स्टार विन डिजल तर जणू दीपिकाच्या अभिनयाच्या प्रेमातच पडला. याच प्रेमापोटी ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न आॅफ जेंडर केज’ पुढील भागातही दीपिकाची वर्णी लागणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डीजे यांनी ट्विटरवर याबाबचे संकेत दिले आहे. ‘एक्सएक्सएक्स- रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या पुढील सीरिजमध्ये दीपिका पादुकोण नक्कीचं असेल,असे त्यांनी एका कमेंटला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.
दीपिका पादुकोणचा दुसरा हॉलिवूड सिनेमाही पक्का! विन डिजेलसोबत पुन्हा जमणार जोडी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:08 IST