Join us  

दीपिका पादुकोणने इरफान खानचा व्हिडिओ शेअर करत म्हटले परत ये, व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 2:54 PM

इरफानच्या निधनाच्या धक्क्यातून अजून दीपिका सावरलेली नाहीये. तिने सोशल मीडियावर इरफानचा एक व्हिडिओ शेअर करत तू परत ये असे म्हटले आहे.

ठळक मुद्देदीपिकाने शेअर केलेला हा व्हिडिओ पिकू या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. या व्हिडिओत दीपिका आणि इरफान टेनिस खेळताना आपल्याला दिसत आहेत. या व्हिडिओसोबत दीपिकाने लिहिले आहे की, प्लीज तू परत ये...

इरफान खानच्या अकाली निधनाने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. २९ एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात इरफानने अखेरचा श्वास घेतला. सुमारे आठवडाभरापूर्वी कोलोनच्या संसर्गामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान इरफानने कायमचे साऱ्यांना अलिवदा म्हटले.

इरफानच्या निधनाच्या धक्क्यातून अजून कोणीच सावरलेले नाहीये. पिकू या चित्रपटातील त्याची नायिका दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर इरफान खानचा एक व्हिडिओ शेअर करत तू परत ये असे म्हटले आहे. दीपिकाच्या या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. दीपिकाने शेअर केलेला हा व्हिडिओ पिकू या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. या व्हिडिओत दीपिका आणि इरफान टेनिस खेळताना आपल्याला दिसत आहेत. या व्हिडिओसोबत दीपिकाने लिहिले आहे की, प्लीज तू परत ये... यासोबतच दीपिकाने ब्रोकन हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे.

दीपिकाचा हा व्हिडिओ पाहून इरफानचे चाहते भावुक होत आहे. इरफानची कमतरता नेहमीच बॉलिवूडला भासणार असे ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

पिकू या चित्रपटाला ८ मे ला पाच वर्षं पूर्ण झाले, त्यावेळी दीपिकाने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाच्या सेटवरचा मजा-मस्ती करतानाचा फोटो पोस्ट केला होता आणि त्यासोबत लम्हे गुज़र गये चेहरे बदल गये.. हे पिकूमधील गाणे पोस्ट केले होते. पिकू या चित्रपटात दीपिका पादुकोण, इरफान खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते.  

टॅग्स :दीपिका पादुकोणइरफान खान