Join us  

लग्नानंतर बॉलीवुडची मस्तानी करणार रुपेरी पडद्यावर कमबॅक, बालपणीचा फोटो शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 10:54 AM

काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दीपिकाने मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती दिली होती.

'पद्मावत' चित्रपटानंतर बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. अभिनेता रणवीर सिंह रेशीमगाठीत अडकल्यानंतर आता दीपिका आता मेघना गुलजारच्या सिनेमातून दीपिका रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. दीपिकानं सोशल मीडियावरील पोस्टनुसार ती लवकरच 'छपाक' सिनेमाच्या शुटिंगसाठी सज्ज होत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दीपिकाने मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती दिली होती. दीपिकाने सोशल मीडियावर आपला बालपणाचा एक फोटो शेअर केला आहे.

 

या बालपणाच्या फोटोला दीपिकाने “बॅक टू स्कूल?छपाक” असं कॅप्शन दिले आहे. या फोटोत दीपिका 6 ते 7 वर्षीय मुलीच्या रुपात पाहायला मिळत आहे. तिने आपल्या हातात बॅग पकडली आहे. छपाक चित्रपटाची कथा ऐकून स्तब्ध झाली होती आणि हादरूनही गेली होती असं दीपिकाने नुकतंच एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. 

या चित्रपटातून रसिकांना बरंच काही पाहायला मिळणार असल्याचंही तिने नमूद केले होते. चित्रपटाची स्क्रीप्ट वाचून ती अशी काही प्रभावित झाली की ही कथा अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावी अशी इच्छा तिने व्यक्त केली. ही कथा लोकांपर्यंत पोहोचल्यास समाजाची काळी बाजूही समोर येईल असं दीपिकाला वाटतं. त्यामुळेच की दीपिकाने अभिनयासह 'छपाक' चित्रपटात आणखी एक वेगळी भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे.

दीपिका पादुकोणने मानधनाबाबत केला खुलासा, वाचा सविस्तर

कोणत्या चित्रपटासाठी किती मानधन घ्यायचे हे मला माहित आहे. माझा अभिनय, माझे काम या सर्वांची कल्पना मला आहे. त्यामुळे मी माझ्या कामाला अनुसरूनच मानधन मागते. मानधनाच्या बाबतीत कोणतीच तडजोड मी यापुढे करणार नाही. कोणाला किती मानधन दिले जाते याची कल्पना प्रत्येकाला असते मलाही आहे. एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी किती खर्च येतो हेही मला ठाऊक आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच मी मानधन मागते. मात्र जर अभिनेत्याला जास्त मानधन द्यायचे आहे. म्हणून तुम्हाला कमी मानधन देतोय असे जर मला कोणी सांगितले तर मात्र मी हे खपवून घेणार नाही, तर मी मानधनाच्या बाबतीत कधीच तडजोड करणार नाही.' 

टॅग्स :दीपिका पादुकोण