Join us  

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 7:47 PM

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.

ठळक मुद्देकरण जोहरने सोशल मीडियावर दिल्या शुभेच्छा

बऱ्याच दिवसांपासून रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची सुरू होती. आज ते दोघे विवाह बंधनात अडकले आहेत.  या दोघांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडला. त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. मात्र या विवाह सोहळ्यातील फोटो अद्याप समोर न आल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. दिग्दर्शक करण जोहर या विवाह सोहळ्यात उपस्थित होता. त्याने सोशल मीडियावर सर्वात आधी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पहिल्यांदा दीपिका आणि रणवीरला करण जोहरने  सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या शुभेच्छा देत लिहिले की, दोघांची जोडी नितांत सुंदर दिसत आहे, इतकी सुंदर की या क्षणी दोघांचीही नजर काढा. 

इटलीत उपस्थित असलेल्या करणने दोघांचाही फोटो शेअर केला नाही म्हणूनच चाहते काहीसे नाराज झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी ट्विट करत करणकडे दोघांचे फोटो अपलोड करण्याची विनंती केली आहे. मात्र दीपिका आणि रणवीरनं पाहुण्यांपुढे ठेवलेल्या अटीमुळे कोणालाही या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. फोटोग्राफर्सकडूनच फोटो मिळाल्यानंतर ते सोशल मीडियावर शेअर करावे अशी दोघांची इच्छा आहे. हे फोटो मोबाईलमध्ये कोणीही काढू नये यासाठी मोबाइल कॅमेऱ्याला स्टिकर्स लावून झाकण्यात आल्याचेही समजते आहे.

करण जोहर शिवाय सोशल मीडियावर अभिनेत्री निमरत कौरने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :दीप- वीररणवीर सिंग