Join us  

​एक्स-बॉयफ्रेन्डच्या भावांसोबत नशेत धूंद दिसली ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण ! इंटरनेटवर झाली ट्रोल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 4:50 AM

बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी ट्रोल होणे नवे नाही. आता ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे. अलीकडे दीपिकाने ‘पद्मावती’चे ...

बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी ट्रोल होणे नवे नाही. आता ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे. अलीकडे दीपिकाने ‘पद्मावती’चे शूटींग पूर्ण केले. या चित्रपटाचा ट्रेलर आणि ‘घूमर’ गाणे जबरदस्त हिट झाल्याच्या आनंदात दीपिकाने अलीकडे एक पार्टी दिली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. या पार्टीचे काही इनसाईड फोटोही आम्ही तुम्हाला दाखवले होते. याच पार्टीतील दीपिकाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेमक्या याच फोटोमुळे दीपिकाला ट्रोल व्हावे लागले आहे. आता या फोटोत असे काय आहे, तर ‘मस्तानी’ दीपिका पूर्णपणे ‘मदमस्त’ झालेली यात दिसतेय. होय, राज कपूर यांची मुलगी रिमा जैन  हिचा मुलगा अरमान जैनने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.या फोटोत दीपिका अरमान आणि त्याचा भाऊ आदर जैन (दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरचे आतेभाऊ) यांच्या खांद्यावर हात टाकून उभी आहे. या फोटोत अरमानच्या हातात मद्याचा ग्लास आहे आणि दीपिकाचे म्हणाल तर ती पूर्णपणे नशेत असल्यासारखी दिसतेय. कदाचित इतकी नशेत की, तिला अरमानच्या खांद्यांचा आधार घ्यावा लागतोय, असे भासतेय.ALSO READ: SEE PICS : ​ दीपिका पादुकोणच्या पार्टीत सर्वात आधी पोहोचला रणवीर सिंग!अन्य एका फोटोत आदर दीपिकाच्या गालावर किस करताना दिसतोय. याच फोटोवरून दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागलेय. ‘ती पूर्ण मद्यधुंद अवस्थेत असून  विचित्र दिसतेय,’ असे एका युजरने कमेंटमध्ये म्हटलेय. तर अन्य एका युजरने थेट दीपिकाला विक्षिप्त ठरवले आहे.‘मला दीपिका फार आवडते. पण गेल्या काही  दिवसांत ती खूप विक्षिप्त वागू लागलीय,’ असे या युजरने लिहिलेय. अन्य एका युजरने दीपिकाचा हा फोटो पोस्ट केल्याबद्दल अरमान जैनला लक्ष्य केले आहे. ‘निश्चितपणे हा फोटो पार्टीचा आहे. पार्टीत कुणीही ‘हाय’ होऊ शकतं. पण अरमान जैनने हाच फोटो का पोस्ट करावा, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे,’ असे त्याने लिहिलेय.याआधीही दीपिकाचे  मद्यधुंद अवस्थेतले फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहरसोबतचा तिचा मद्यधुंद अवस्थेतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.