Join us  

दीपिका पादुकोणने रिलेशनशिपवरून विचारलेल्या प्रश्नाला दिले रोखठोक उत्तर, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 10:43 AM

‘पद्मावत’ या वादग्रस्त चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या भलतीच चर्चेत आहे. एकीकडे चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच तिच्या ...

‘पद्मावत’ या वादग्रस्त चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या भलतीच चर्चेत आहे. एकीकडे चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच तिच्या रिलेशनशिपवरूनही काही खुलासे समोर येत आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्वत: दीपिकानेच तिच्या रिलेशनशिपवरून काही वक्तव्य केले. जेव्हा तिला तिच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, आम्ही नेहमीच ए, बी किंवा सी म्हणविणाºया बॉक्सपर्यंतच स्वत:ला मर्यादित ठेवतो. मला असे वाटते की, आयुष्य यापेक्षाही वेगळे आहे. त्यामुळे लोकांनी मी सिंगल आहे की विवाहित आहे यावर विचार करणे वायफळ आहे. २०१८ या वर्षाच्या सुरुवातीलाच माध्यमांमध्ये ही बातमी आली होती की, न्यू ईअर व्हेकेशनसाठी आपल्या परिवारासोबत मालदीवला गेलेली दीपिका बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत साखरपुडा करणार. त्याचबरोबर असेही म्हटले जात होते की, ५ जानेवारी रोजी आपल्या वाढदिवसालाच दीपिका साखरपुडा करणार. मात्र नंतर या सर्व बातम्या अफवा असल्याचे समोर आले. सध्या दीपिका आणि तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग त्याच्या ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ज्या पद्धतीने या दोघांनी चित्रपटात काम केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. सध्या सर्वत्र या दोघांचीच चर्चा रंगत आहे. त्याचबरोबर हे दोघे आता लग्न करतील, अशीही नव्याने चर्चा समोर येत आहे. परंतु ज्यापद्धतीने दीपिकाने आपले मत मांडले, त्यावरून सध्यातरी ती लग्नाच्या विचार करत नसेल असेच दिसत आहे. दरम्यान, या दोघांचा ‘पद्मावत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. आतापर्यंत चित्रपटाने तीनशे कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाला करणीसेनेकडून प्रचंड विरोध झाला. मात्र अशातही ज्यापद्धतीने चित्रपट कमाई करीत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल.