सोशल मीडियावर प्रियंकाच्या ड्रेसची खिल्ली उडाल्यानंतर दीपिका पादुकोणनेही तोडली चुप्पी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 16:36 IST
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या तिच्या ‘मेट गाला २०१७’मध्ये परिधान केलेल्या महाकाय ड्रेसमुळे चर्चेत आहे. प्रियंकाच्या या ड्रेसची देशोदेशी ...
सोशल मीडियावर प्रियंकाच्या ड्रेसची खिल्ली उडाल्यानंतर दीपिका पादुकोणनेही तोडली चुप्पी!
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या तिच्या ‘मेट गाला २०१७’मध्ये परिधान केलेल्या महाकाय ड्रेसमुळे चर्चेत आहे. प्रियंकाच्या या ड्रेसची देशोदेशी चर्चा रंगत असताना सोशल मीडियावर तिच्या या ड्रेसची खिल्लीही उडविली जात आहे. आता तिच्या या ड्रेसवर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिनेही चुप्पी तोडली आहे. दीपिकाने लोरियल कान्स कलेक्शनच्या लॉचिंगप्रसंगी म्हटले की, ‘मेट गालामध्ये मी किंवा प्रियंकाने काय परिधान केले यापेक्षा त्यामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी मिळणे हे महत्त्वाचे आहे.’ मेट गाला २०१७’मध्ये प्रियंकाबरोबरच दीपिका पादुकोणही सहभागी झाली होती. मेटमध्ये बॉलिवूडमधील मोजक्याच सेलिब्रिटीज्ना सहभागी होण्याची संधी मिळत असते. त्यामध्ये दीपिका आणि प्रियंकाचे नाव जोडले गेल्याने भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण म्हणावा लागेल. न्यू यॉर्क येथे आयोजित केलेल्या या समारंभात प्रियंकाने रेड कार्पेटवर लाल्फ लॉरेनने डिझाइन केलेला खाकी रंगाचा ट्रेंच कोट घातला होता. प्रियंकाने या कोटबरोबर ब्लॅक शूज घातले होत, तर डोळ्यात स्मोकी मेकअपने प्रियंका खूपच सेक्सी दिसत होती. प्रियंकाची रेड कार्पेटवर एंट्री अनेकांना अवाक् करणारी होती. या ड्रेसमुळे प्रियंकाचे सर्वत्र कौतुकही केले गेले. मात्र सोशल मीडियावर तिची या ड्रेसवरून चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. तर दीपिका मेट गालामध्ये प्रिसेंस अवतारात बघावयास मिळाली. पांढºया रंगाच्या या गाउनमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. सध्या दीपिका कान्सची तयारी करीत आहे. याच महिन्याच्या १७ ते २८ मे दरम्यान फ्रान्समध्ये कान्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता दीपिका खूपच उत्साही दिसत असून, सध्या ती त्याच्या तयारीत व्यस्त आहे.