पुन्हा दिसणार दीपिका पादुकोण व इरफान खानची आॅनस्क्रीन केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 14:35 IST
इरफान खान आणि दीपिका पादुकोण यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. ‘पिकू’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली ...
पुन्हा दिसणार दीपिका पादुकोण व इरफान खानची आॅनस्क्रीन केमिस्ट्री!
इरफान खान आणि दीपिका पादुकोण यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. ‘पिकू’ या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसली होती. अलीकडे या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झालीत. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक झाले होते. खुद्द इरफानेही दीपिकाच्या कामाची मनापासून प्रशंसा केली होती. कदाचित इरफानला दीपिकाची प्रशंसा करण्याची अशीच एक आणखी संधी मिळणार आहे. होय, दीपिका व इरफान हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसू शकतात. विशाल भारद्वाजच्या चित्रपटात ही जोडी एकत्र स्क्रिन शेअर करू शकते.आज खुद्द इरफानने याचे संकेत दिले. इरफानचा ‘हिंदी मीडियम’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये इरफानने ‘पिकू’ चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. दीपिकासोबत काम करणे माझ्यासाठी एक आत्मशोध होता. तो अतिशय चांगला व आनंददायी अनुभव होता. तिच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कदाचित आम्ही पुन्हा एकत्र दिसू शकतो. ‘पिकू’चे शूटींग संपले त्यादिवसापासून मी या क्षणाची प्रतीक्षा करतोय, असे तो म्हणाला. दीपिका एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. ती स्वत:ला एकाच चौकटीत बांधून ठेवत नाही, असेही तो म्हणाला. इरफानच्या ‘हिंदी मीडियम’मधून पाकिस्तानी अॅक्ट्रेस सबा कमर बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. ‘मांतो’ अणि ‘लाहोर से आगे’ अशा पाकिस्तानी चित्रपटांतून तिने काम केलेले आहे. तसेच फवाद खानसोबत हिट पाकिस्तानी सिरीयल ‘दास्तान’मध्येसुद्धा ती झळकलेली आहे. दिल्ली येथील चांदणी चौक येथे राहणाºया एका मध्यम वर्गीय कुटूंबाला दिल्लीच्या हाय सोसायटीमध्ये अॅडजस्ट होण्यासाठी कराव्या लागणाºया धडपडीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.