Join us  

दीपिका पादुकोणच्या ‘स्ट्रगल’ची धक्कादायक कहाणी! मिळाला होता असाही सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 9:10 PM

दीपिका पादुकोण आजघडीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण एकेकाळी याच दीपिकाला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी चित्रविचित्र सल्ले दिले गेले होते.

दीपिका पादुकोण आजघडीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी आणि सर्वाधिक व्यस्त अभिनेत्री म्हणूनही ती परिचित आहे. पण एकेकाळी याच दीपिकाला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी चित्रविचित्र सल्ले दिले गेले होते. होय, ताज्या मुलाखतीत दीपिका याबद्दल बोलली. संघर्षाच्या त्या दिवसांत कुणी काय काय सल्ले दिलेत, हे तिने सांगितले.इवनिंग स्टँडर्ड या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, त्या काळात अनेकांनी मला अनेक गोष्टी सुचवल्यात. काम मिळवण्यासाठी बूब जॉब (स्तनांची सर्जरी) करण्याचा सल्ला मला दिला गेला. दिग्दर्शक व निर्मात्यांच्या डोळ्यांत भरण्यासाठी हा एक सर्वात सोपा पर्याय असल्याचे मला सांगितले गेले. काहींनी मला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्याचेही सुचवलेले मला आठवते. पण मी हे सल्ले पूर्वीपासूनच मनावर घेतले नाहीत. कारण मला काय करायचे, हे मला ठाऊक होते. मी कायम आपल्या मनाचे ऐकले आणि मन जे सुचवेल, तेच मी केले.अभिनेत्री बनण्याचे माझे स्वप्न कधीही नव्हते, असेही तिने सांगितले. मी एक अ‍ॅथलीट होते. मी मॉडेल बनेल किंवा मग अभिनेत्री बनेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. पण घरातून बाहेर पडून मी काही करू इच्छित होते. या निर्णयावर मी ठाम होते. या निर्णयानेचं मला मॉडेलिंगच्या दुनियेत आणून सोडले आणि पुढे अभिनयाच्या वाटेवरही माझा प्रवास सुुरू झाला. विशेष म्हणजे, ही वाट मला भावली. मी या प्रवासात लवकरच रमले, असे ती म्हणाली.२०१४ या वर्षांत खरे तर दीपिकाने स्वत:ला सिद्ध केले होते. आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव आले होते. पण याच वर्षांत दीपिकाच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ सुरू होती. लोकांसाठी सगळे ठीक होते. पण मी नैराश्याच्या गर्तेत बुडाले होते. तुमच्याजवळ किती पैसा आहे, किती यशस्वी आहात, याने डिप्रेशनला काहीही फरक पडत नाही. डिप्रेशन चोरपावलांनी येतं आणि सगळं उद्धवस्त करून जात. मी नशिबवान होते की, मला याबद्दल लवकर कळले आणि मी यातून बाहेर पडू शकले, असेही दीपिका म्हणाली.

टॅग्स :दीपिका पादुकोण