‘दंगल’ चा ट्रेलर दिवाळीला होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 18:02 IST
आमिर खानचा आगामी चित्रपट दंगल ची खूप चर्चा आहे. त्यामुळे त्याचे ट्रेलरही खास दिवशी म्हणजे दिवाळीला रिलीज करण्यात येणार ...
‘दंगल’ चा ट्रेलर दिवाळीला होणार रिलीज
आमिर खानचा आगामी चित्रपट दंगल ची खूप चर्चा आहे. त्यामुळे त्याचे ट्रेलरही खास दिवशी म्हणजे दिवाळीला रिलीज करण्यात येणार आहे. शाहरुख खानच्या ‘डियर जिंदगी’चेही ट्रेलर याचवेळी रिलीज होण्याची चर्चा आहे. दंगलच्या ट्रेलरला करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ व अजय देवगनचा ‘शिवाय’ सोबत अॅटेच केले जाऊ शकते. आतापर्यंत या चित्रपटाचे केवळ एकच पोस्टर रिलीज झाले आहे. त्यामध्ये आमिर हा आपल्या मुली व मुलांसोबत दिसत आहे. दंगलमध्ये आमीर हा पहिलवान महावीर सिंह फोगाट च्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची क था महावीर सिंह व त्याच्या मुलीवर आधारित आहे. यामध्ये फातिमा सना शेख (गीता फोगाट) व सन्या मल्होत्रा (बबीता कुमारी ) या दोघी आमिरच्या मुलींची भूमिका करीत आहेत. गीता व बबीतानेही आंतरराष्ट्रीलय पातळीवर रेसलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी असून, आमिरच्या अपोजिट साक्षी तंवर दिसणार आहे. आमिरचा दंगल हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. मध्यंतरी रिलीज डेट लांबणीवर लांबणीवर पडण्याचे वृत्त होते. परंतु, आमिरने त्याला अफवा असल्याचे म्हटले आहे.