Join us

सल्लूमियाँच्या जीवाला धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 21:37 IST

बॉलीवूडचा सूपरस्टार सलमान खान याला संपवून टाकू अशा आशयाचा फोन काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना येत आहे. पोलिस तो फोन ...

बॉलीवूडचा सूपरस्टार सलमान खान याला संपवून टाकू अशा आशयाचा फोन काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना येत आहे. पोलिस तो फोन कुठून येतो आहे? याचा तपास करत आहेत. पहिला फोन १६ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांना आला होता. लगेचच दुसºया दिवशीही तसाच कॉल आला. अजून हे निश्चित झाले नाही की, या फोन करणाºया व्यक्तीच्या मागे एक किंवा अनेक लोकांची टीम आहे. विघातक कॉलर सलमान खानच्या जीवाला धोका करण्याच्या विचारात आहे. साऊथ मुंबई मरिन लाईन्स आणि सबर्बन मालाड येथील पीसीओतील कॉल्स ट्रेस करण्यात आले आहेत. अद्याप पोलिसांकडे कुठलीही तक्रार याबाबतीत आलेली नाही. त्यामुळे पोलिस सध्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासत आहेत.