Join us  

भाग नोरा भाग...एअरपोर्टवर गाडीतून उतरून अचानक धावू लागली नोरा?, व्हायरल होतोय व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 8:32 PM

नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

बाटला हाऊसमधील साकी साकी गाण्यावरील जबरदस्त डान्स, जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते चित्रपटातील आयटम साँग आणि सलमानच्या भारत चित्रपटात काम केल्यानंतर विकी कौशलसोबत पछताओगे या गाण्यात झळकलेली अभिनेत्री नोरा फतेही दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे.  नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओत ती एअरपोर्टवर धावताना दिसते आहे. 

नोराचा व्हायरल झालेला व्हिडिओ तिने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती एअरपोर्टवर गाडीतून उतरल्यावर अचानका धावू लागली. त्यावर तिचा मित्र तिच्यावर हसू लागला होता. तरीदेखील धावताना आणि हसताना दिसते आहे. तिच्या या व्हिडिओवर खूप कमेंट्स येत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती देखील मिळते आहे. 

नोरा फतेहीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती जेव्हा कॅनडातून भारतात आली होती तेव्हा तिच्याजवळ फक्त पाच हजार रुपये होते. ती म्हणाली की, मी भारतात फक्त ५००० रुपये घेऊन आली होती. मी ज्या एजेंसीमध्ये काम करत होतो तिथे मला आठवड्याला ३००० रुपये मिळत होते. या पैशांमध्ये दैनंदिन जीवन व्यतित करणं कठीण झालं होतं. त्यावेळी मी स्मार्ट पद्धतीनं मॅनेज केलं होतं. 

टॅग्स :नोरा फतेही