Join us
Daily Top 2Weekly Top 5

मादाम तुसादमध्ये दलजीत दोसांझचा मेणाचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 21:00 IST

जगभरातील प्रसिद्ध वॅक्स आकर्षण असणारे मादाम तुसादने नुकतेच पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे.

जगभरातील प्रसिद्ध वॅक्स आकर्षण असणारे मादाम तुसादने नुकतेच पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. दिल्लीतील मादाम तुसादमध्ये हा दिलजीतचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला आहे.

दिलजीत दोसांझचे भारतात खूप चाहते आहे. दिल्लीतील मादाम तुसादमध्ये भारत व जगभरातील प्रसिद्ध कलाकारांचे मेणाचे पुतळे आहेत. त्याचा मेणाचा पुतळा म्युझिक झोनमध्ये ठेवण्यात आला आहे. दलजीतने उडता पंजाब, फिलौरी व सूरमा यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. दिलजीतने बऱ्याच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे. 

मादाम तुसादमध्ये मेणाचा पुतळा लाँच करण्यात आल्यामुळे दिलजीत दोसांझ खूप खूश आहे आणि त्याने सांगितले की, मी भारत व परदेशातील प्रसिद्ध कलाकारांमध्ये येऊन खूपच खूश आहे. मी मादाम तुसाद टीमचा खूप आभारी आहे. कारण माझा रियल लाईफ फिगर बनवला आणि मला चाहत्यांच्या आणखीन जवळ आणले. मी माझ्या चाहत्यांना दिल्लीतील मादाम तुसादमध्ये येऊन तिथल्या कलेचे उत्कृष्ट नमुने पाहण्यासाठी निमंत्रित करतो.

टॅग्स :दिलजीत दोसांझ