Join us  

फक्त कतरिनाच नाही तर ही अभिनेत्रीसुद्धा आहे सलमानच्या खूप क्लोज, बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली करिअरची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 11:23 AM

तिला कोणताही सल्ला हवा असले तर सलमानला फोन करतेय.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा अनेकांचा गॉडफादर आहे हे तर सगळ्यांच माहिती आहे. आतापर्यंत अनेक न्यूकमर्सला त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या बॅनर खाली लाँच केले आहे. सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ, प्रनूतन, जरीन खान, डेजी शाहा आणि सई मांजरेकर. भाईजानने आतापर्यंत अनेकांचे करिअर बॉलिवूडमध्ये घडवले आहेत. अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचे जवळचे संबंध आहेत. आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबाबत आज सांगणार आहोत, ज्या अभिनेत्रीला सलमाननेच त्यांच्या सिनेमातून लाँच केले आणि आजही तिला कोणताही सल्ला हवा असले तर ती सलमानला फोन करतेय.

आम्ही बोलतोय डेजी शहाबद्दल. सलमानच्या 'जय हो' सिनेमातून डेजीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात ती सलमानच्या अपोझिट दिसली होती.  वास्तविक डेजीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती 'जय हो' सिनेमानंतर. एका मुलाखती दरम्यान डेजीने म्हणाली, ''मी सलमानसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. अनेक वेळा मला काही सल्ला लागला तर मी सलमानला फोन करते. अशी एकही गोष्ट नाही जी मी सलमानपासून लपवली आहे.'' 

डेजी अभिनेत्री बनण्याअगोदर बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करीत होती. एक दिवस बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे डेजीकडे लक्ष गेले. पुढे त्यांनी तिला त्यांच्या डान्सिग ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. पुढे डेजीने तब्बल दोन वर्षे गणेश आचार्य यांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम केले. पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम केले. या व्यतिरिक्त ती मॉडलिंगमध्ये करिअर करीत होती. याचदरम्यान तिला २००३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

टॅग्स :डेझी शहासलमान खानकतरिना कैफ