Join us  

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना सिनेविश्वातील सर्वोच्च 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 1:18 PM

हिंदी मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सम्मान जाहीर करण्यात आला आहे. 

हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी नुकतंच ट्वीट करत ही घोषणा केली. हिंदी मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सम्मान जाहीर करण्यात आला आहे. 

अनुराग ठाकुर यांचं ट्वीट 

मला हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल वहिदा रहमान यांना यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 

वहिदाजींनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या अभिनयानाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 'प्यासा', 'कागज के फूल', 'चौधवी का चाँद', 'साहेब बिवी और गुलाम', 'गाईड, 'खामोशी' सह अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ५ दशकांच्या आपल्या करिअरमध्ये त्यांनी सर्वोच्च काम करत राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. रेश्मा आणि शेरा सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त वहिदा जी यांनी समर्पण, वचनबद्धता आणि भारतीय नारीच्या ताकदीचे उदाहरण दिले आहे जी तिच्या कष्ट आणि परिश्रमाने व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करु शकते.

मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या समृद्ध कार्याला नम्रपणे अभिवादन करतो जो आमच्या चित्रपट इतिहासाचा एक अंगभूत भाग आहे.

वहिदा रहमान यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३८ साली झाला. तर १९५५ साली त्यांनी तेलुगू सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर १९५६ साली त्यांनी सीआयडी या हिंदी सिनेमात काम केलं. यामध्ये त्यांची निगेटिव्ह भूमिका होती. त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं.  यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. देव आनंद, राज कपूर, राजकुमार, मनोज कुमार आणि सुनील दत्तसह अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत त्यांचे अनेक सिनेमे गाजले. 

टॅग्स :वहिदा रहमानसिनेमाअनुराग ठाकुर