Join us  

दबंग 3 चे कलेक्शन पाहून सलमान खानच्या चाहत्यांना लागलीय ही चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 11:11 AM

भाईजानच्या चाहत्यांनी दबंग 3 या सिनेमाची भरभरून प्रशंसा केली पण काहींनी मात्र हा सिनेमा पाहिल्यानंतर ‘भाई कब तक? असा सवाल केला.

ठळक मुद्देसलमानचा चित्रपट म्हटला की, पहिल्याच विकेंडला चित्रपट 100 कोटीचा गल्ला सहज जमवतो. पण दबंग उद्यापर्यंत तरी 100 कोटीचा गल्ला जमवणार का ही चिंता सलमानच्या चाहत्यांना लागली आहे.

भाईजान सलमान खानचादबंग 3’ हा सिनेमा या 20 डिसेंबरला रिलीज झाला आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. भाईजानच्या चाहत्यांनी या सिनेमाची भरभरून प्रशंसा केली पण काहींनी मात्र हा सिनेमा पाहिल्यानंतर ‘भाई कब तक? असा सवाल केला. चांगले चित्रपट बनव... नाहीतर संन्यास घे’ अशा शब्दांत काहींनी सलमानला सुनावले. पण असे असूनही सलमानच्या डाय हार्ट चाहत्यांच्या जोरावर रिलीजनंतर तीन दिवस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. पण आता हा चित्रपट 100 कोटी रुपये तरी कमावणार का अशी चिंता सलमानच्या चाहत्यांना लागली आहे. 

दबंग 3 या चित्रपटाने पहिल्या दिवशी 24.50 कोटी इतकी कमाई तर शनिवारी 24.75 कोटी इतकी कमाई केली. या चित्रपटाने रविवारी चांगला व्यवसाय केला. रविवारी तर या चित्रपटाने 31.90 इतके कलेक्शन केले. पण सोमवारी या चित्रपटाचे कलेक्शन चांगलेच घसरले. सोमवारी या चित्रपटाने केवळ 10.70 कोटी इतकी कमाई केली. मंगळवारी देखील या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले नाही. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 91.85 कोटी इतकीच कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. 

सलमानचा चित्रपट म्हटला की, पहिल्याच विकेंडला चित्रपट 100 कोटीचा गल्ला सहज जमवतो. पण दबंग उद्यापर्यंत तरी 100 कोटीचा गल्ला जमवणार का ही चिंता सलमानच्या चाहत्यांना लागली आहे. ख्रिसमसची सुट्टी असल्याने बुधवारी दबंग 3 हा चित्रपट १०० कोटीचे कलेक्शन करेल असे म्हटले जात आहे.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने 24.50 कोटींची कमाई केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावरच्या अनेक युजर्सनी हा आकडा खोटा असल्याचा आरोप केला होता. केआरके अर्थात कमाल आर खान याने सर्वप्रथम या आकड्यावर आक्षेप घेतला होता. ‘हे फेक कलेक्शन आहे. माझ्याकडे फक्त दोनच शब्द आहेत, आ... थू... हे फेक कलेक्शनही चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवू शकत नाहीत,’ असे केआरकेने म्हटले होते. त्यानंतर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

टॅग्स :दबंग 3सलमान खान