Join us

राखी सावंतच्या प्रियकराविरोधात गुन्हा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 06:09 IST

आदिलने हल्ला केला तसेच फसवणूकही केल्याचा राखीचा आरोप आहे.

मुंबई :

अभिनेत्री आणि रिॲलिटी टीव्ही स्पर्धक राखी सावंतने तिचा प्रियकर आणि दुबईस्थित व्यावसायिक आदिल दुर्राणीविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच फसवणुकीची तक्रार केली आहे. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आदिलने हल्ला केला तसेच फसवणूकही केल्याचा राखीचा आरोप आहे. राखीचे दुसरी अभिनेत्री शर्लिन चोप्राशी वाद सुरू आहेत. राखीच्या चारित्र्यावर शर्लिनने चिखलफेक करत केलेल्या आरोपांमुळे आदिल कंटाळला होता आणि त्यामुळे त्याचे राखीशी वाद झाले. तसेच पुढे हाणामारीही झाली. तिने तिच्या तक्रारीत असाही आरोप केला आहे.  

राखीने सलमान खानने होस्ट केलेल्या एका शोमध्ये प्रवेश करणारा चित्रपट निर्माता/दिग्दर्शक साजिद खानला पाठिंबा दिल्याने हे भांडण सुरू झाले. साजिद खान याच्यावर शर्लिन चोप्रासह चित्रपटसृष्टीतील विविध महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. 

टॅग्स :राखी सावंत