Join us

​क्रिकेट कॉमेंट्री...छा गये शाहरूख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 21:13 IST

बुधवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेलेला भारत-बांगला देश वर्ल्डकप टी-२० सामना सर्वांसाठी खास ठरला. का? अहो का, म्हणजे काय, किंग खानच्या कॉमेन्ट्रीने.

बुधवारी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेलेला भारत-बांगला देश वर्ल्डकप टी-२० सामना सर्वांसाठी खास ठरला. का? अहो का, म्हणजे काय, किंग खानच्या कॉमेन्ट्रीने. मुंबईतील एका स्टुडिओतून शाहरूखने फटकेदार कॉमेन्ट्री केली. यावेळी  स्टुडिओत शाहरूखसोबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हजर हेते. सामन्याच्या सुरुवातीला अर्धा तास किंगखान शाहरूख खानने जोरदार कॉमेन्ट्री करीत सर्वांना जिंकून घेतले. मला जेव्हा केव्हा वाटते की, मॅच टफ होणार आहे, तेव्हा मी सुरूवातीचे पाच ओवर पाहणे टाळतो, असे एक गुपितही त्याने यावेळी सांगितले. शाहरूख सध्या ‘रईस’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. मात्र भारत-बांगलादेश मॅचदरम्यान कॉमेन्ट्री करण्यासाठी तो खास ब्रेक घेऊन टेलिकास्ट कंपनीच्या मुंबई स्टुडिओत पोहोचला.