Join us  

CoronaVirus: रमजानमध्ये सोनू सूद 25 हजार लोकांना देणार भोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 11:00 AM

सोनू सूदच्या या निर्णयाचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे.

कोरोनारूपी संकटाने जग भयग्रस्त झाले असताना मदतीचे अनेक हातही पुढे येत आहेत. अदृश्य शत्रूची लढणाना देशातील लहान-थोर सगळेच मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या दानशूरतेचे दर्शन घडवत, मदत दिली आहे. त्यात अभिनेता सोनू सूद याने मुंबईच्या जुहूस्थित आपले हॉटेल डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचा-यांसाठी खुले केले.तसेच तो दररोज सुमारे 45,000 हून अधिक गरजू लोकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करतो आहे. आता त्याने रमजानच्या दृष्टीने असेच काही करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनू सूद आता रमजान महिन्यात भिवंडी परिसरात राहणाऱ्या 25 हजारांहून अधिक लोकांना फूड किट वाटप करणार आहे.

ही मदत बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या दुर्गम शहरांमधून आलेल्या स्थलांतरित आणि गरजू लोकांना करण्यात येणार आहे. त्याच्या या मदतीचे अनेकांनी कौतुक केले आहे. 

याबाबत सोनू सूद सांगतो की, हा खूप कठीण काळ आहे आणि या काळात प्रत्येकाने एकमेकांना मदत करणे फार गरजेचे आहे. या उपक्रमातून मी त्या सर्वांना मदत करू इच्छितो आहे, जे भुकेलेले आहेत. विशेषत: रमजानमध्ये दिवसभर उपवास करून ते उपाशी राहू नये म्हणून आम्ही खास जेवणाचे किट उपलब्ध करून देत आहोत.

टॅग्स :सोनू सूदकोरोना वायरस बातम्या