Join us  

CoronaVirus : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले कमल हसन, स्वतःच्या घरातच बनवणार तात्पुरते हॉस्पिटल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 5:29 PM

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले कमल हसन

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यात आता दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन हेदेखील पुढे सरसावले आहेत. ते त्यांच्या घरात तात्पुरते रुग्णालय बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहे.

कमल हसन यांनी ट्विट केले की, संकटाच्या या वेळी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना न्याय व्यवस्थेत आणण्यासाठी, बिल्डिंग जे माझे घर होते, अस्थायी लोकांची मदत करायचे आहे.

यापूर्वी कमल हसन यांनी नरेंद्र मोदी यांच्या 21 दिवस लॉकडाऊनच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट तमीळ भाषेत लिहून म्हटले होते की, सरकारला याबद्दल विचार करायला पाहिजे की 21 दिवसांपर्यंत लॉकडाऊन दरम्यान कामगार व ग्रामीण आपले पोट भरण्यासाठी कुठे जाणार आणि त्यांच्या दुर्देशेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हे फक्त श्रीमंत बिझनेसमनना मदत करण्याची ही वेळ नाही.

कमल हसन यांच्यासोबतच सुपरस्टार पवन कल्याण यांनी देखील मोठी रक्कम मदत निधी म्हणून दिली. कल्याण यांनी सांगितले की, या कठीण समयी 1 कोटींची मदत भारत सरकारला करायची आहे. त्यांनी ट्विट केले की, मी आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे समर्थन करण्यासाठी पीएम रिलीफ फंडसाठी 1 कोटी रुपये निधी म्हणून द्यायचा आहे. यावेळी त्यांचे अनुकरण आणि प्रेरणादायी नेतृत्वच आपल्या देशाला या कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवेल.

 

टॅग्स :कमल हासनकोरोना वायरस बातम्या