Join us  

CoronaVirus: कोरोना मुक्त झालेली ही अभिनेत्री करणार रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:00 PM

कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी या अभिनेत्रीनं रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार सातत्याने मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. या दरम्यान कोरोना व्हायरसवर यशस्वी मात करणारी अभिनेत्री जोया मोरानी, तिची बहिण शजा मोरानी आणि वडील करीम मोरानी कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोरोना व्हायरसवर यशस्वी मात केल्यानंतर त्यांनी रक्तदान करण्याची घोषणा केली आहे.

 मुंबई मिररला झोयाने दिलेल्या मुलाखतीत देखील रक्तदान आणि कोरोनाग्रस्तांना मदत करणार असल्याचे सांगितले होते. झोया म्हणाली होती की, आम्ही या आठवड्यात रक्तदान करणार आहोत. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर १४ दिवसांनंतर आपण रक्तदान करू शकतो.

अभिनेत्री झोया मोरानीसह तिची बहीण शाजा मोरानी आणि वडील करीम मोरानी याना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक आठवड्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

सध्या मोरानी कुटुंब घरी आयसोलेशनमध्ये आहेत. लवकरच त्यांच्या आयसोलेशनचा कालावधी संपणार असून ते त्यानंतर रक्तदान करणार आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबॉलिवूड