Join us
Daily Top 2Weekly Top 5

महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 23:51 IST

बिग बी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे.

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बिग बी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. आत्ताच माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या आजूबाजूला असलेल्या सर्वांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्या असं आवाहनही बच्चन यांनी केले आहे. 

याआधीही झाला होता कोरोना

देशात कोरोनाची लाट होती तेव्हा जुलै २०२० मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोना झाला होता. या दोघांवर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तर कुटुंबातील जया बच्चन, ऐश्वर्या रॉय, आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमिताभ बच्चन