Join us

‘कुली नंबर 1’ची टीम झाली ‘प्लास्टिक फ्री’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 15:47 IST

‘कुली नंबर 1’च्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लास्टिक फ्री कॅम्पेनला पाठींबा देत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे‘कुली नंबर 1’ हा चित्रपट 1995 मध्ये याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक आहे.

‘सोशल कॉज’च्या बाबतीत बॉलिवूड सेलिब्रिटी कायम एक पाऊल पुढे असतात. आता ‘कुली नंबर 1’च्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लास्टिक फ्री कॅम्पेनला पाठींबा देत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.होय, वरूण धवन व सारा अली खान स्टारर या चित्रपटाच्या क्रूने शूटींगदरम्यान प्लास्टिक बॉटल्सऐवजी मेटॅनिक बॉटल्सचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांना सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. आमिर खान, करण जोहर, दिया मिर्झा, भूमी पेडणेकर अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मोदींच्या आवाहनला पाठींबा दर्शवला होता. आता ‘कुली नंबर 1’ची टीम या मोहिमेत सामील झाली आहे.

‘कुली नंबर 1’चा लीड अभिनेता वरूण धवन यानेही आपल्या सहकाºयांना प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. ‘कुली नंबर 1चा सेट प्लास्टिक फ्री बनवण्यासाठी मी निर्मात्यांचे आभार मानतो,’ असेही त्याने म्हटले आहे. देश प्लास्टिक मुक्त होणे, काळाची गरज आहे. आपल्या पंतप्रधानांनी एक चांगली सुरुवात केली. छोटे छोटे बदल घडवून आपण या कार्यास हातभार लावून एक मोठा बदल घडवू शकतो, असेही वरूणने म्हटले आहे.

‘कुली नंबर 1’ हा चित्रपट 1995 मध्ये याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. ‘कुली नंबर 1’मध्ये गोविंदा, करिश्मा कपूर, कादर खान, शक्ती कपूर मुख्य भूमिकेत होते. ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये वरूण धवन व सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. वरूणचे वडील डेव्हिड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

टॅग्स :वरूण धवन