T 2182 - 10yrs of TWITTER ..!! Congratulations !! Goodness however did we exist and subsist without it before !!
TWITTER ची दशकपूर्ती ‘बिग बीं’कडून अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 22:00 IST
तुमचे आमचे व्यक्त होण्याचे लोकप्रीय माध्यम असलेल्या TWITTERचा आज(२१ मार्च) दहावा वाढदिवस आहे. या दशकपूर्तीनिमित्त TWITTERवर संपूर्ण जगभरातून शुभेच्छांचा ...
TWITTER ची दशकपूर्ती ‘बिग बीं’कडून अभिनंदन
तुमचे आमचे व्यक्त होण्याचे लोकप्रीय माध्यम असलेल्या TWITTERचा आज(२१ मार्च) दहावा वाढदिवस आहे. या दशकपूर्तीनिमित्त TWITTERवर संपूर्ण जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिग बी अमिताभ यांनीही TWITTERला शुभेच्छा दिल्या आहेत. TWITTER येण्याआधी आपण कसे राहू शकलो...याचेच आश्चर्य मानत अमिताभनेTWITTERचे अभिनंदन केले. सन २००६ मध्ये आजच्याच दिवशी TWITTERचा सहसंस्थापक जॉक डॉर्सी याने ‘जस्ट सेटिंग अप माय टिष्ट्वट’ असे पहिले वहिले टिष्ट्वट केले होते. टिष्ट्वटरच्या दशकपूर्तीनिमित्त लाखो युझर्सने TWITTERवर शुभेच्छांचा वर्षाव केला. टिष्ट्वटरनेही एका व्हिडिओच्या माध्यमातून या लाखो युझर्सचे आभार मानले. बिझ स्टोन, इव्हान विलियम्स आणि जॅक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या आॅस्टिन शहरात TWITTER सुरु केले होते. आज जगातील प्रत्येक महत्त्वपूर्ण व्यक्ति TWITTERवर आहे. दररोज ५० कोटींहून अधिक टिष्ट्वट केले जातात.