Join us  

CONFIRMED..!! सनी देओल बनणार हनुमान, 'रामायण'साठी 'या' कलाकारांची लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 1:18 PM

Sunny Deol : नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'रामायण' चित्रपटात सनी देओलची भूमिका निश्चित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

नितीश तिवारी (Nitish Tiwari) 'रामायण' (Ramayana Movie) बनवत आहेत आणि या महाकाव्यातील भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलशी चर्चा झाली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून रामायणच्या कलाकारांबद्दल बरेच काही बोलले जात होते. यामुळे जगभरातील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आता चार महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर समजते आहे की सनी देओल(Sunny Deol)ची रामायणातील भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात सनी देओलची भूमिका निश्चित करण्यात आली आहे. त्याने या भूमिकेला होकार दिला आहे आणि त्यासाठी तो खूप उत्सुक आहे. सूत्रांनी सांगितले की, "सनी देओल आयुष्यात एकदाच भगवान हनुमानाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने खूप उत्सुक आहे. ही एक स्टार कास्ट आहे जी स्वत: देवाने सेट केली आहे. भगवान हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहेत आणि सध्या ही भूमिका साकारण्यासाठी सनी देओलपेक्षा कोण चांगला असू शकतो."

सनी देओल मेमध्ये करणार शूटिंगला सुरूवात

अभिनेता सनी देओल मे २०२४ मध्ये 'रामायण: भाग एक' मधील त्याच्या भागाचे शूटिंग सुरू करेल. तर सनी देओल यात पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात त्याची पूर्ण उपस्थिती असेल. निर्मात्यांना खात्री आहे की दारा सिंग नंतर सनी देओलच आजच्या काळात भगवान हनुमानासाठी योग्य वाटेल. यासोबतच रामायणातील पुष्टी झालेल्या नावांमध्ये रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीताच्या भूमिकेसाठी साई पल्लवी,रावणाच्या भूमिकेत यश, हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल आणि कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता यांचा समावेश आहे.

टॅग्स :सनी देओलरणबीर कपूरलारा दत्तायश