Join us

Confirm : प्रभास ‘साहो’मध्येही दिसणार ‘बाहुबली’ अवतारात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 22:34 IST

‘बाहुबली’ अर्थात प्रभास सध्या मुंबईत असून, काल रात्रीच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. तेथून तो लगेचच दिग्दर्शक तथा ...

‘बाहुबली’ अर्थात प्रभास सध्या मुंबईत असून, काल रात्रीच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. तेथून तो लगेचच दिग्दर्शक तथा निर्माता करण जोहर याच्या घरी रवाना झाला होता. ज्याठिकाणी त्याने ‘बाहुबली’च्या इतर स्टारकास्टसोबत ‘बाहुबली’ची सक्सेस पार्टी सेलिब्रेट केली. यावेळी त्याचा को-स्टार राणा दुग्गुबत्ती हादेखील उपस्थित होता. अर्थातच या पार्टीत प्रभास हाच आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याने त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाविषयीची चर्चाही याठिकाणी रंगल्याचे बघावयास मिळाले. या चर्चेतील सर्वात महत्त्वाचा सूर म्हणजे प्रभास त्याच्या लुकवर प्रचंड मेहनत घेत असून, तो आगामी ‘साहो’मध्ये कसा दिसेल हा होता. अर्थातच आम्ही जेव्हा याविषयीची माहिती घेतली तेव्हा प्रभास ‘साहो’मध्येदेखील त्याच्या ‘बाहुबली’ लुकमध्येच बघावयास मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, काही दिवसांपूर्वीच जेव्हा प्रभासचा ‘साहो’मधील लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हा तो क्लीन सेव्हमध्ये असल्याचे दिसून आले होते. परंतु आता आलेल्या माहितीनुसार प्रभास दाढी लुकमध्येच बघावयास मिळणार आहे. खरं तर प्रभासचा हा लुक लकी चार्म असून, त्याच्या फॅन्सलादेखील तो याच लुकमध्ये अधिक आवडतो. त्यामुळे तो आगामी ‘साहो’मध्ये दाढी लुकमध्ये दिसणार आहे. दरम्यान, चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून, प्रभासदेखील लवकरच शूटिंगला सुरुवात करणार आहे. असो, प्रभासच्या या लुकविषयी सांगायचे झाल्यास प्रभास स्वत: याविषयी जाणून आहे की, त्याचा हा चार्मिंग लुकच त्याला इंडस्ट्रीत मोठा पल्ला गाठण्यास साहाय्यभूत ठरणार आहे. कारण प्रभासच्या याच लुकवर त्याचे फॅन्स मेहरबान असून, ‘साहो’मध्येदेखील याच लुकमध्ये बघणे पसंत करतील. दरम्यान, काल जेव्हा तो विमानतळावर बघावयास मिळाला तेव्हा त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळा चष्मा घातला होता. विशेष म्हणजे यावेळीदेखील त्याची दाढी वाढलेली दिसून आली. सायंकाळी जेव्हा तो पार्टीत हजर राहिला तेव्हा त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. या लुकमध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. प्रभास नुकताच अमेरिकेतून सुट्या एन्जॉय करून हैदराबादला परतला आहे. ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर प्रभास ‘साहो’मध्ये तुफान अ‍ॅक्शन करताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ‘बाहुबली’प्रमाणे याही चित्रपटात त्याच्या अपोझिट देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी असणार आहे. ‘बाहुबली’मुळे या जोडीला प्रचंड पसंती मिळाली असल्याने पुन्हा एकदा हे दोघे ‘साहो’मध्ये रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल १५० कोेटी रुपये असून, हा चित्रपट २०१८ साली रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीजर ‘बाहुबली’ रिलीजच्या वेळीच रिलीज करण्यात आला होता.