Join us  

कन्फर्म! खिलाडी कुमार अक्षय दाक्षिणात्य सिनेमात करणार पदार्पण, 'या' सुपरस्टारसोबत शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 1:51 PM

अक्षय दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

सध्या अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहेत. तर काही दाक्षिणात्य सुपरस्टार कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात अक्षय दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

विष्णू मंचू यांनी सोशल मीडियावर अक्षयसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'कन्नप्पाचा प्रवास अधिक रोमांचक झाला आहे. आम्ही अक्षय कुमारचे तेलगू चित्रपटसृष्टीत स्वागत करतो. कन्नप्पासोबत तेलुगु सिनेमात पदार्पण केल्याची घोषणा करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. तुम्ही कधीही विसरणार नाही अशा रोमांचक अनुभवासाठी सज्ज व्हा'. अक्षयच्या तेलुगु डेब्यूची माहिती कळताच चाहते खुश झाले आहेत.

'कनप्पा' नावाचा हा तेलुगु चित्रपट असणार आहे. हा चित्रपट विष्णू मंचू यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ज्यामध्ये प्रभास महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 'कनप्पा' हा बिग बजेट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग करणार आहेत.  अक्षय आणि प्रभाससोबतच या सिनेमात  मोहन बाबू, सरत कुमार, ब्रह्मानंदम यांसारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी हॉलिवूडचे सिनेमॅटोग्राफर शेल्डन चाऊ आणि ॲक्शन डायरेक्टर केचा खामफकडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रभूदेवाही चित्रपटाच्या टीमशी जोडला गेला आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, नुकतेच त्याचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा ॲक्शन थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.  अक्षय कुमार लवकरच रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमात झळकणार आहे. यासोबतच खिलाडी कुमारचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. 'स्काय फोर्स' हा त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तसेच अभिनेत्याचे 'वेलकम टू द जंगल','हाऊसफुल्ल 5' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  

टॅग्स :अक्षय कुमारप्रभाससेलिब्रिटीबॉलिवूड