Join us
Daily Top 2Weekly Top 5

Confirm : लवकरच सुरू होईल ‘हाउसफुल-४’ची शूटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 21:21 IST

आताच आलेल्या माहितीच्या आधारे दिग्दर्शक साजिद खान याने कन्फर्म केले की, लवकरच ‘हाउसफुल-४’च्या शूटिंगची तयारी सुरू केली जाणार आहे. ...

आताच आलेल्या माहितीच्या आधारे दिग्दर्शक साजिद खान याने कन्फर्म केले की, लवकरच ‘हाउसफुल-४’च्या शूटिंगची तयारी सुरू केली जाणार आहे. साजिद याच्या ‘हाउसफुल’ या कॉमेडी चित्रपटाने आज सात वर्षे पूर्ण केले आहेत. याच आनंदाच्या क्षणी साजिद याने ‘हाउसफुल-४’ चे संकेत दिले आहेत. साजिदने म्हटले की, ‘माझ्या हाउसफुल या चित्रपटाला आज सात वर्षे पूर्ण झाले आहेत. खरं तर मला यावर विश्वासच बसत नाही. माझ्याकडे एक ग्रेट टीम, ग्रेट युनिट आणि ग्रेट फ्रेंचायजी आहे. त्यामुळेच आतापर्यंत ‘हाउसफुल’चे तीन भाग बनविण्यात आले असून, यास प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता वेळ आली की, चौथ्या पार्टचीही लवकरच सुरुवात केली जावी.’ दरम्यान, ही बातमी लगेचच अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. रितेशने आतापर्यंतच्या तिन्ही भागांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ‘हाउसफुल’च्या पहिल्या इन्स्टॉलमेन्टमध्ये अक्षयकुमार, दीपिका पादुकोण, अर्जुन रामपाल, रितेश देशमुख, लारा दत्ता, जिया खान आणि बोमन इरानी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या दुसºया आणि तिसºया भागात, जॅकलीन फर्नांडिस, जरीन खान, श्रेयस तळपदे, जॉन अब्राहम, ऋषी कपूर, रणधीर कपूर, मिथुन चक्रवर्ती, नर्गिस फाकरी, अक्षयकुमार आणि रितेश देशमुख यांच्या भूमिका होत्या. यातील कॉमन बाब म्हणजे तिन्ही भागांमध्ये अक्षयकुमार आणि रितेश देशमुख यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ‘हाउसफुल-४’मध्येही अक्षयकुमार आणि रितेश देशमुख यांचे नाव निश्चित समजले जात आहे.  वास्तविक अभिनेता चंकी पांडे यानेदेखील ‘हाउसपुल-४’चे संकेत दिले होते. कारण चंकी पांडे यानेदेखील हाउसफुल सिरिजच्या प्रत्येक भागांमध्ये काम केले आहे. ‘हाउसफुल-३’ २०१६ मध्ये रिलीज झाली होती. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे.