Join us

Confirm : अमिताभ बच्चन अन् जया बच्चन पुन्हा एकदा एकत्र झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 20:16 IST

महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, हे आयकॉनी कपल लवकरच पडद्यावर एकमेकांसोबत ...

महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, हे आयकॉनी कपल लवकरच पडद्यावर एकमेकांसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. ही बातमी पूर्णत: कन्फर्म असून, निर्माता सुजित सरकार यांच्या आगामी चित्रपटात हे कपल रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. ‘पिंक’नंतर सुजित सरकार नव्या चित्रपटाची तयारी करीत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाची कथा विवाहित असलेल्या ४० वर्षांच्या एका कपलची आहे. वयोवृद्ध असतानाही त्यांच्यातील प्रेम हे कायम असल्याचे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. अमिताभ आणि जया यांची जोडी या कथेसाठी अगदी योग्य असल्याने, त्यांची नावे निश्चित समजली जात आहेत. सध्या अमिताभ आणि जया यांच्यात याच चित्रपटावरून चर्चा सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, अमिताभ आणि जया लवरकच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, सुजित सरकार यांनी आतापर्यंत या चित्रपटाचे नाव घोषित केले नाही. शिवाय सुजितकडून याविषयी अद्यापपर्यंत कोणतेही आॅफिशियल कन्फर्मेशन आलेले नाही. अखेरीस अमिताभ आणि जया ‘चिनी कम’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. शिवाय त्यांचा मेकअप मॅन दीपक सावंत यांच्या भोजपुरी चित्रपटातही हे दोघे बघावयास मिळाले होते. अमिताभ आणि जया ही एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये टॉपची जोडी समजली जात होती. ‘जंजीर, अभिमान, मिली, सिलसिला आणि कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात ही जोडी झळकलेली आहे. या सर्व चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगला करिष्मा केला होता. खरं तर जेव्हा-जेव्हा ही जोडी पडद्यावर झळकली तेव्हा-तेव्हा प्रेक्षकांनी त्यास भरपूर प्रेम दिले आहे. अमिताभ-जया यांच्या विवाहाला ४४ वर्षे पूर्ण झाले आहेत. ३ जून १९७३ रोजी हे दोघेही विवाह बंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते अमर सिंग यांनी अमिताभ आणि जया यांच्या लग्नाविषयी खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर या दोघांच्या लग्नावरून मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. अमर सिंग यांनी दावा केला होता की, अमिताभ आणि त्यांची पत्नी जया गेल्या कित्येक वर्षांपासून विभक्त राहत आहेत. या वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.