Join us

कन्सेप्ट आवडली - सोहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:41 IST

बॉलीवुड अभिनेता कुणाल खेमुचा चित्रपट 'गुड्ड की गन' प्रदर्शनास सज्ज आहे. हा एक अडल्ट कॉमेडी चित्रपट असून अश्या विनोदी ...

बॉलीवुड अभिनेता कुणाल खेमुचा चित्रपट 'गुड्ड की गन' प्रदर्शनास सज्ज आहे. हा एक अडल्ट कॉमेडी चित्रपट असून अश्या विनोदी भूमिका करणे सोपे नसून अवघड काम असल्याचे कुणालने सांगितले. कुणालची पत्नी अभिनेत्री सोहा अली खान याबाबत म्हणाली, 'हा चित्रपट कुणालने माझ्या सांगण्यावरून स्वीकारला आहे, परंतु मी याची संपूर्ण कथा वाचलेली नाही.पण कन्सेप्ट मला फार आवडली होती. चित्रपटातील गाणेही अतिशय छान असून फिल्म नक्कीच यशस्वी होईल, असे मला वाटते. कुणाल आणि चित्रपटाच्या संपुर्ण टीमवरच माझा विश्वास आहे.'