Join us  

Commando 3 Box Office Collection: 'कमांडो ३'ची दमदार ओपनिंग, कमविले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:17 PM

अभिनेता विद्युत जामवालचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कमांडो ३' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

बॉलिवूडचा कमांडो म्हणजेच अभिनेता विद्युत जामवालचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कमांडो ३' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली असून पहिल्याच दिवशी ४.४७ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट २५४१ स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'कमांडो ३' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४.४७ कोटींची कमाई केली आहे.

'कमांडो ३' चित्रपटाची कथा विद्युत जामवाल म्हणजेच कमांडो करण सिंग डोगरा याच्या अवतीभवती फिरतो. करण लंडनमध्ये एका अज्ञात व्यक्तीला शोधत असतो.

ज्याने भारतावर दहशतवादी हल्ला करतो. त्याला शोधण्याच्या मोहिमेत करणला अदा शर्मा व अंगिरा धर यांची साथ मिळते. हे तिघे त्या अज्ञात व्यक्तीला शोधण्यात यशस्वी होतात की नाही, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 

'कमांडो ३' हा चित्रपट 'कमांडो' चित्रपटाची तिसरी फ्रंचाइजी आहे. यात विद्युतसोबत अदा शर्मादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर गुलशन देवैया यात निगेटिव्ह भूमिका करताना दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तने केले असून या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शहा हे आहेत.

टॅग्स :विद्युत जामवालकमांडो ३अदा शर्मा