Join us

"जॉन अब्राहम कूल दिसतो, कारण तो ड्रग्ज...", CM फडणवीसांनी केलं अभिनेत्याचं कौतुक, काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:22 IST

अंमली पदार्थविरोधी अभियानात भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी जॉन अब्राहमचं उदाहरण देत त्याचं कौतुक केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अंमली पदार्थविरोधी अभियानात भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनीजॉन अब्राहमचं उदाहरण देत त्याचं कौतुक केलं.  "जॉन अब्राहम कूल दिसतो कारण तो ड्रग्जला नाही म्हणतो" असं फडणवीस म्हणाले. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"जॉन अब्राहमसारखे अतिशय प्रतिथयश कलावंत ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे. पण, ते बघत असतानादेखील जॉन अब्राहम कूल दिसतो कारण तो ड्रग्ज घेत नाही. त्या वातावरणातही ड्रग्जला नाही म्हणण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. माझ्या जीवनात मीदेखील कधीही कुठल्याही अंमली पदार्थाला शिवलेलो नाही. आता तर शक्यच नाही. पण, कॉलेजमध्येदेखील कधी कुणाची मला विचारायची आणि सवय लावायची हिंमत झाली नाही. याचं कारण म्हणजे हा निर्धार आपल्या मनात असला पाहिजे".

दरम्यान, जॉन अब्राहम हा बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि डॅशिंग अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेदा या सिनेमात तो दिसला होता. आता २०२५ मध्ये 'तेहरान' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :जॉन अब्राहमदेवेंद्र फडणवीसअमली पदार्थ