Join us  

Cirkus Trailer : करंट लगा रे...! रणवीर सिंगच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर, दीपिका पादुकोणचं मोठं सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 3:36 PM

Cirkus Trailer : रोहित शेट्टी आणि त्याचा सिम्बा रणवीर सिंग ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. सिम्बा आणि सूर्यवंशीनंतर आता हे दोघेही लवकरच 'सर्कस' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि त्याचा सिम्बा रणवीर सिंग (Ranveer Singh) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. सिम्बा आणि सूर्यवंशीनंतर आता हे दोघेही लवकरच 'सर्कस' (Cirkus Movie) चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. ज्यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कसची संपूर्ण पलटण एकत्र दिसली होती. या छोट्या टीझरमध्ये जॉनी लीव्हर आणि संजय मिश्रा यांनी या चित्रपटात ६० च्या दशकातील लूक असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. आता लोकांची उत्सुकता आणखी वाढवत निर्मात्यांनी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या 'सर्कस' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंगच्या दुहेरी भूमिकेत असून त्याच्यासोबत मल्टी टॅलेंटेड कलाकार पाहायला मिळत आहेत.

सर्कसच्या ट्रेलरची सुरुवात इलेक्ट्रिक मॅन (रणवीर सिंग) पासून होते. मग सर्कसचा तमाशा सुरू होतो. त्यानंतर पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिससारख्या सौंदर्यवतींची एंट्री होते. इलेक्ट्रिक मॅनकडे निसर्गाचा करिष्मा आहे आणि पूजा हेगडेसोबत नोकझोंक आहे. जॅकलिनला पुन्हा पाहून रणवीरचे हृद्य धडकू लागते. सुमारे साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये वरुण शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, व्रजेश हिरजी, मुकेश तिवारी, संजय मिश्रा, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव आणि अश्विनी कळसेकर असे सर्व स्टार्स दिसत आहेत. ट्रेलरमध्ये रोहित शेट्टीने दीपिका पादुकोणची एक छोटीशी झलक दाखवली आहे, ज्यामध्ये दीपिका चित्रपटातील 'तुम नचा तो सबको करंट लगा रे' या गाण्यावर रणवीर सिंगसोबत नाचताना दिसत आहे.

रोहित शेट्टीने सर्कसच्या ट्रेलरमध्ये गोलमालशी एक मजेदार कनेक्शन देखील जोडले आहे. ट्रेलरचा शेवट गोलमालच्या स्टारकास्टसह गोपाल, लक्ष्मण आणि माधवसह होतो. या सीननंतर रोहित शेट्टी त्याचा पुढचा कॉमेडी चित्रपट गोलमाल ५ ला जोडून दाखवू शकतो. सर्कसमध्ये अजय देवगणचा कॅमिओ असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

टॅग्स :रणवीर सिंगरोहित शेट्टीदीपिका पादुकोणजॅकलिन फर्नांडिसपूजा हेगडेसिद्धार्थ जाधव