Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या संगीत सेरेमनीसाठी 'हा' कोरिओग्राफर शिकवणार डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:50 IST

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या लग्नाकडे लागले आहे.

ठळक मुद्देप्रियांका आणि निक जोनास सुद्धा लग्नाच्या लागले तयारीला

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या लग्नाकडे लागले आहे. प्रियांका व निक डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार आहेत. सध्या त्यांच्या संगीत व मेहंदी कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा मेहंदी व संगीत कार्यक्रम २९ व ३० नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. संगीत सेरेमनीसाठी कोरियोग्राफरला बोलवण्यात आले असून गणेश हेगडे डान्स बसवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निक या कार्यक्रमात देसी गर्ल या गाण्यावर थिरकणार आहे. या गाण्यावर गणेश त्याला डान्स शिकवणार आहे.

दीपिका आणि रणवीरनंतर आता प्रियांका चोप्रा-निक जोनास यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. देसी गर्ल प्रियांका आणि निक जोनास सुद्धा लग्नाच्या तयारीला लागले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका आणि निक २ डिसेंबरला जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये शाही समारंभात लग्न करणार आहेत. मात्र त्यांच्या लग्नाच्या व्हेन्यूबाबत अधिकृतपणे काही माहिती देण्यात आलेली नाही. निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले असून ३० नोव्हेंबरपासून प्रियांकाच्या लग्नाचे विधी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. प्रियांका आणि निक यांनी आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास