Join us

बाल अभिनेता मास्टर रतन उर्फ रतन कुमार यांचे कराचीमधे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 15:27 IST

सतीश डोंगरेपन्नासच्या दशकातील लोकप्रिय बाल अभिनेता मास्टर रतन उर्फ रतन कुमारचं कराचीमधे निधन झालं. 'बैजू बावरा', 'बूट पॉलिश', ...

सतीश डोंगरेपन्नासच्या दशकातील लोकप्रिय बाल अभिनेता मास्टर रतन उर्फ रतन कुमारचं कराचीमधे निधन झालं. 'बैजू बावरा', 'बूट पॉलिश', 'जाग्रती', 'दो बिघा जमीन' यासारख्या चित्रपटांतल्या त्याच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. रतन कुमार 1960 सालापासून पाकिस्तानमधे स्थायिक झाले होते.कला, चित्रपट आणि संस्कृती यामुळे तयार झालेले अनेक कलाकार दिर्घकाळासाठी प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले आहेत. त्यातलाच एक कलाकार म्हणजे रतन कुमार.पन्नाशीच्या दशकात रतन कुमार हे पाकिस्तानमधील आवडते बालकलाकार होते. सलीम रजा यांनी १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेदारी’ चित्रपटासाठी ‘आओ बच्चे सैर कराए तुमको पाकिस्तानकी’ हे राष्ट्रभक्तीपर गीत लिहले होते. या गीतात  बालकलाकार रतनकुमार झळकले होते.  पन्नाशीच्या दशकात रतन कुमार हे सर्वात नावाजलेले आणि आवडते बालकलाकार होते. बेबी तबज्जुम आणि बेबी नाज यांच्यानंतर मुंबई चित्रपट सृष्टीतील रतन कुमार हे नावजलेले नाव आहे. दहा दिवसांपूर्वी त्यांना निमोनिया झाल्याने कॅलिफोर्नियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १२ डिसेंबरच्या दुपारी वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना दोन मुले, एक मुलगी आणि सात नातवंडे आहेत. कुमार यांचे खरे नाव सैय्यद नाझीर अली रिझवी असे होते. पण भारतीय कलाकार प्रेम अदिब यांच्या सुचनेने रिझवी यांचे पडद्यावरचे नाव रतन कुमार असे ठेवण्यात आले होते. त्याविषयी बोलताना रिझवी यांनी सांगितले होते की, त्याकाळात पडद्यावरचे नाव वेगळे ठेवण्याचा ट्रेंड होता. दिलीप कुमार यांचेही नाव त्याच ट्रेंडला अनुसरून होते. रिझवी अर्थात रतन कुमार यांचा जन्म १९४१ साली झाला होता. त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी म्हणजेच १९४६ मध्ये त्यांना भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. लेखक क्रिषन चंदर यांनी लिहलेल्या दिग्दर्शित केलेल्या आणि निर्मित केलेल्या ‘राख’ या चित्रपटात त्यांची पहिली बालकलाकार म्हणून भूमिका होती. त्यांना मिळालेली प्रसिद्धी एकाच रात्रीतील नव्हती.जस-जसे त्यांना चित्रपट मिळू लागले तसा त्यांचा अनुभव वाढू लागला. कालांतराने ते अनुभवी आणि सुपरिचित बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्याकाळी त्यांनी मिना कुमारी यांच्यासोबत (बैजू बावरा - १९५२) संतोश कुमार यांच्यासोबत (बेदारी - १९५७) नर्गिस यांच्यासोबत् (अंगारे - १९५४) मधुबाला यांच्यासोबत (बहुत दिन हो गये) विमल रॉय यांच्या (दो बिघा जमीन) बलदेव राज चोपडा यांच्या चित्रपटात आणि राज कपूर यांच्या १९५४ सालच्या ‘बुट पॉलिश’ या चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे.