Join us

'कुछ कुछ होता है'मधील 'छोटा सरदार' परजान दस्तूर अडकला विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 19:15 IST

परजान दस्तूरने त्याची गर्लफ्रेंड डेलना श्रॉफसोबत नुकतेच लग्न केले आहे.

शाहरूख खान आणि काजोल यांचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता हे'ला लोकांनी सर्वात जास्त पसंती दर्शवली होती. या चित्रपटातील प्रत्येक मुख्य पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले होते. या चित्रपटात छोटा सरदारची भूमिका साकारलेला बालकलाकार परजान दस्तूरने आपल्या अभिनयाने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली होती. त्याने सिनेमात केवळ एकच डायलॉग म्हटला होता, 'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ।' जो हिट झाला होता. आता परजान मोठा झाला असून नुकताच तो लग्न बेडीत अडकला आहे. 

परजान दस्तूरने त्याची गर्लफ्रेंड डेलना श्रॉफसोबत नुकतेच लग्न केले आहे. त्या दोघांनी पारंपारिक पारशी पद्धतीने लग्न केले आणि या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नात परजानने पारंपारिक पारशी पोशाख आणि टोपी घातली होती तर डेलनाने मरून रंगाची साडी घातली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये परजानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सांगितले होते की ते जानेवारी महिन्यात लग्न करणार आहे. परजान आणि डेलनाने २०१९मध्ये एंगेजमेंट केली होती.

परजानने 'कुछ कुछ होता है'नंतर कहो ना प्यार है, हाथ का अंडा, ब्रेक के बाद, है दिल बार बार, हम तुम परजानिया, पॉकेट मम्मी, कभी खुशी कभी गममध्ये दिसला होता. 2009 मध्ये पीयूष झा यांच्या सिकंदर सिनेमात तो मुख्य भूमिकेत दिसला होता.

टॅग्स :शाहरुख खानकाजोल