Join us

चॅलेंज! ओळखा पाहू विचित्र टोपी घातलेल्या या गोंडस मुलीला?, आज आहे बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 16:42 IST

बऱ्याचदा कलाकार सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करतात. त्यांच्या बालपणीच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते.

बऱ्याचदा कलाकार सोशल मीडियावर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करतात. तसेच त्यांच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. त्यांच्या बालपणीच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. दरम्यान, नुकताच विचित्र टोपी घातलेल्या एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ही चिमुरडी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor). 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ३५ वर्षांची आहे. तिचा जन्म ३ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईतच झाला. त्याचे वडील प्रसिद्ध चित्रपट खलनायक शक्ती कपूर आहेत. तर आईचे नाव शिवांगी आहे, जी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीची बहीण आहे. तिचे वडील पंजाबी असतील पण ती स्वतःला तिच्या आईसारखी मराठी समजते.

श्रद्धाचे सुरुवातीचे शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथे झाले. इथे ती फुटबॉल खेळायची. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती बोस्टनला गेली. श्रद्धाचा पहिला चित्रपट ‘तीन पत्ती’ होता. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली होती. ती एका शाळकरी मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ‘लव्ह का द एण्ड’ हा आणखी एक चित्रपट केला. हा देखील चित्रपट फार यशस्वी ठरला नाही. दरम्यानच्या काळात महेश भट यांच्या चित्रपटाने तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. महेश भट यांच्या आशिकी २ चित्रपटात तिला मुख्य भूमिका मिळाली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि रातोरात श्रद्धाला खूप लोकप्रियता मिळाली.

त्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यामध्ये एक खलनायक, हैदर, गोरी तेरे प्यार में, स्त्री अशा बऱ्याच चित्रपटात ती झळकली. त्यानंतर ती सुपरस्टार प्रभाससोबत ‘साहो’मध्ये दिसली.

टॅग्स :श्रद्धा कपूर