सेलिना जेटलीने दाखविला बिकिनीत बेबी बंप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 09:32 IST
सेलिना जेटली पुन्हा एकदा आई होणार आहे. सेलिनाने नुकताच आपला एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यात ती बिकिनीमध्ये ...
सेलिना जेटलीने दाखविला बिकिनीत बेबी बंप !
सेलिना जेटली पुन्हा एकदा आई होणार आहे. सेलिनाने नुकताच आपला एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे त्या फोटोत तिचा बेबी बंपदेखील दिसत आहे. सेलिना या पोजमध्ये खूपच सुंदर दिसत असून यासोबत तिने एक चांगला महत्त्वपूर्ण संदेशही दिला आहे. सेलिनाने म्हटले आहे की, ‘मला माहित आहे की, बरेच लोक यावरून निगेटिव्ह कमेंट्स करतील आणि मला विचारतील की, गर्भावस्थाशी संबंधीत फोटो बिकिनीमध्ये का शेअर करीत आहे, मात्र मला वाटते की भारतात गर्भावस्थाशी संबंधीत बुरसटलेले विचार बदलण्याची खूपच आवश्यकता आहे.’‘दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म देण्याच्या प्रक्रियेदरम्यान मला समजले की, आपणास योग्य आहार आणि योग्य व्यायामाने आपल्या शरीरास आणि मनाला पोषण द्यावे आणि आपणास या गोष्टींचीही जाणिव असायला हवी की, आरोग्य आणि उर्जा सर्व आकार आणि प्रकारात मिळते.’सेलिना अगोदरच दोन जुळ्या मुलांची आई आहे आणि पुन्हा एकदा ती जुळ्याच मुलांना जन्म देणार आहे. सेलिनाने २०११ मध्ये पीटर हाग या बिजनेसमॅनशी लग्न केले होते आणि ती सध्या सिंगापुर आणि दुबईत राहत आहे.